Shirdi Sai Baba

|| Jai Sai ||

 
 
 

Sai Babanchey Akra Vachan

Shirdi Sai Babanchi Akra Vachane

शिरडीस ज्याचे लागतील पाय।
टळती अपाय सर्व त्याचे 1

माझ्या समाधीची पायरी चढेल॥
दुःख हे हरेल सर्व त्याचे ॥2

जरी हे शरीर गेलो मी टाकून
तरी मी धावेन भक्तासाठी 3

नवसास माझी पावेल समाधी॥
धरा द्रढ बुद्धी माझ्या ठायी 4

नित्य मी जिवंत जाणा हेंची सत्य॥
नित्य घ्या प्रचीत अनुभवे ॥5

शरण मज आला आणि वाया गेला॥
दाखवा दाखवा ऐसा कोणी ॥6

जो जो मज भजे जैशा जैशा भावे॥
तैसा तैसा पावे मीही त्यासी ॥7

तुमचा मी भार वाहीन सर्वथा
नव्हे हें अन्यथा वचन माझे ॥8

जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस॥
मागे जे जे त्यास ते ते लाभे ॥9

माझा जो जाहला काया वाचा मनीं
तयाचा मी ऋणी सर्वकाळ ॥10

साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य॥
झाला जो अनन्य माझ्या पायी ॥11

||Anantkoti Brahmandanayak Rajadhiraaj Yogiraj Parabramha Sadguru Sacchindananda Sainath Maharaj Ki Jai ||